बहूजन महिलांची प्रेरणा स्रोत – त्यागमूर्ती माता रमाबाई

माझ्या बंधू व भगिनींनो ,
👉 आज आमची लेकरं जिवंत आहेत कारण कोणीतरी आमच्यासाठी कधीतरी स्वतःच्या चार लेकरांची कुर्बानी दिलेली आहे .
👉 आज आम्ही आमच्या लेकरांचा उच्च प्रतीच्या दवाखान्यात ‘ ICU ‘ मध्ये इलाज करू शकतो कारण आमच्यासाठी कोणीतरी कधीतरी स्वतःच्या लेकराला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी जवळ कवडी ही नाही म्हणून मांडीवरच लेकराचा जीव जाताना पाहिलेले आहे.
👉 माझ्या राजरतनचा अंत्यविधी मी आज माझ जुनं लुगड फाडून त्यामध्ये करतेय कारण नवीन कापड घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत परंतु या नंतर , भविष्यात कोणत्याही लेकराचा अंत्यविधी जुन्या कपड्यात होणार नाही यासाठी रांत्रदिवस कोणीतरी कधीतरी झटलले आहे.
👉 माझ्या नंतर ,माझ्या समाजातील महिलांना अंगभर सोन्याची दागिने घालता आली पाहिजे यासाठी कोणीतरी संपूर्ण आयुष्यात सोन्याचा एकही दागिना अंगावर घातलेला नाही.
👉 आज आमच्या गळ्यात मडक्याच्या ठिकाणी टाय आला कारण आमच्यासाठी कोणीतरी आयुष्यभर गळ्यात सोन्याच एकही मंगळसुत्र घातलेले नाही .
👉 आज आमच्याकडे कपाटे भरून साड्या आहेत कारण कोणीतरी आमच्यासाठी चार रंगाची चार तुकडे जोडलेल लुगड नेसून संसार केलाय .
👉 आज आपण आपले हात हँडवाँशने धुवू शकतो कारण आपल्यासाठी कोणीतरी आयुष्यभर आपले हात गोव-या थापण्यासाठी शेणात भरवलेले आहेत .
👉 आज आपण कोणत्याही कार्यक्रमाला चांगले नटून-थटून व भारीतभारी पैठणी घालून जाऊ शकतो कारण कोणीतरी आपल्यासाठी बाबासाहेबांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला नवीन लुगड नाही म्हणून शाहू महाराजांनी दिलेला फेटा नेसून गेलेले आहे.
👉 आज आमच्याकडे मोठमोठे बंगले आहेत कारण कोणीतरी आमच्यासाठी आयुष्यभर झोपड्यात राहून संसार केलेला आहे.
👉 आज आपण AC रूममध्ये किंवा कुलरच्या थंड हवेमध्ये राहू शकतो कारण कोणीतरी आपल्यासाठी कडक उन्हाचे व दारिद्रयाचे चटके सहन केलेले आहेत .
👉 आज आम्हाला संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळून हजारो वर्षांच्या गुलामीतून आपण मुक्त झालो कारण आमच्यासाठी कोणीतरी मानव मुक्तीच्या सिद्धांतांत स्वतःला बांधून घेतलेले होते .
👉 आज जरी आमच्यात सामाजिक इमानदारी नसेल परंतु आपल्यासाठी कोणीतरी आयुष्यभर इमानदारीने चंदनासारखे झीजलले आहे.
👉 आज आपल्याला एवढं वाचण्याच्या व लिहिण्याच्या क्षमतेच बनविण्यासाठी बाबासाहेबांसोबत कोणीतरी रात्रीच्या रात्री जागी राहून काढलेल्या आहेत .
या पद्धतीने आज वर्तमानात आपण स्वाभिमानाने,आत्मसन्माने व अधिकार संपन्न असे जीवन जगत आहोत कारण कोणीतरी म्हणजेच त्यागमूर्ती रमाबाई यांनी आपल्यासाठी अतिशय हालअपेष्टा सहन केलेल्या आहेत .
अशा पद्धतीने त्याग ,समर्पन,मेहनत,इमानदारीचे प्रतिक माता रमाबाई यांना स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन .
विनोद इंगळे – बुलडाणा
मो. न.9423446192
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *