भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!

‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो.

परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान व राजकीय पक्षांना विशेष करून पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांच्या सहकार्यांना विश्वासात घेऊन भारतीय प्रशासन सुव्यवस्थित चालविण्यासाठी तथागत गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक या महान भारती सुपुत्र आणि महामानवांचा सुसंदेश व सुशासन शुभ कार्याचा अवश्य स्विकार केला पाहिजे. त्याप्रमाणे जगात आपल्या देशाची ओळख बुद्ध धम्माची व्हावी म्हणून त्यांनी संमती घेतली. बुद्ध धम्माचे प्रतिक कमळाचे फुल हे आपले राष्ट्रीय फुल केले व बोधिवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला राष्ट्रीय वृक्षाची मान्यता दिली व बुद्ध धम्माच्या धाम्माचाक्राला राष्ट्रीय चिन्ह घोषित करून भारताच्या राष्ट्रीय ध्वजावर अंकित करण्यात आले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्व हे बुद्ध धम्माचे तत्व भारतीय संविधानाचे तत्व म्हणून स्विकारण्यात आले.

आपले राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील सर्वात पहिला रंग ज्याला आपण लाल, केशरी, भगवा, नारंगी म्हणतो त्याला भारतीय घटनेचे एका विशेष प्रकारे वर्णन केले आहे. लालसर – पिवळ्या मातीचा रंग जो बौध्द भिक्षूंच्या चीवरांचा रंग असतो. चिवर हे बौध्द भिक्षूंचे वस्त्र आहे जे त्यागाचे प्रतिक आहे. भारतीय शहीदांनी हि आपल्या प्राणाचे त्याग करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. दुसरा पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक मानले जाते. जगातील सर्व देशाशी आपला संबध शांतीचा आणि सत्याच्या आधारावर असावा असा त्यामागचा संदेश देणारा आहे. तिसरा रंग हिरवा जो निसर्गावर व प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा व बुद्ध धाम्मांचा पंचशिलेची शिकवण देणारा रंग आणि भारतीय भूमीचे सुफळा-सुजला यांचे प्रतिक आहे. या तिरंग्याच्या मधोमध बुध्द धम्माचे निळे धम्मचक्र आहे, जे साऱ्या जगाला बुध्द धम्माची ओळख देते. आपण विज्ञानाचा अविष्कार करून आपला व्यवसाय कारखाने आणि उद्योगधंदे विज्ञानाच्या चक्राप्रमाणे गतिमान करून देशाची प्रगती करायची आहे.

भारताचा सर्वोच्च पुरस्कार हि बुद्ध धम्माशी संबंधित आहे. भारत सरकार देशातील सर्वश्रेष्ठ व सर्वोच्च व्यक्तीस ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करतो, असाच सन्मान बौद्ध धम्मात बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न असे त्रिरत्न बौद्ध धम्मात सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्तीला देण्याची परंपरा आहे. आज ही महाराष्ट्रात भन्ते ज्योतीरत्न, भन्ते शन्तिरत्न, भन्ते संघरत्न या नावाचे भिक्षु आहेत. या भारतरत्न पुरस्काराचे चिन्ह स्वरूप देखील बौद्ध धाम्माशी निगडीत आहे.

बोधीवृक्षाच्या पिंपळाचे एक सोनेरी पान ज्यावर पुरस्कार स्विकारणाऱ्या व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते. दुसऱ्या बाजूला चार सिंह हि राजमुद्रा व धम्मचक्र असते. ही राजमुद्रा आपल्या देशातील चलनी नोटा आणि नाणी यावर छापलेले असतात तसेच भारत देश आणि प्रत्येक राज्याला शासकीय कागदोपत्री पृष्ठावर असणे आवश्यक असते. बहुतेक बौद्ध राष्ट्रांत भगवान बुद्धाच्या चरणी कमलचे फुल अर्पण केले जते. कमळाच्या फुलाला पाली भाषेत ‘पदम’ असे म्हणतात.

भारतरत्न या पुरस्काराच्या खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत. त्या पुरस्काराची नावे “पदम-विभूषण” “पदमभूषण ” आणि “पदमश्री” असून सर्व क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तीला हे पुरस्कार सन्मानपूर्वक दिले जाते. या पुरस्कारावर ही “कमळाचे चिन्ह” असते. “अशोक चक्र, परमवीर चक्र आणि वीर चक्र” हे युद्ध शौर्यातील भारतीय जवानांना राष्ट्रपतीच्या हस्ते देण्यात येत असलेल्या पुरस्कारावर ही “कमळाचे चिन्ह” असते. इतकेच नव्हे तर चित्रपट सृस्टीत सर्वात उच्च पुरस्कार म्हणजे ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारावर कमळाचे सोनेरी चित्र असते. तसेच भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला ‘सुवर्णकमळ’ हा पुरस्कार दिला जतो. भारताच्या राष्ट्रपती भवनातील प्रमुख दिवाणखान्याचे नाव ‘अशोका हॉल’ आहे. सम्राट अशोकांच्या मंत्री मंडळाच्या नगरीचे नांव ‘जनपथ’ होते. दिल्ली मधील केंद्रीय मंत्री मंडळाच्या निवासस्थान परिसराचे नाव हि ‘जनपथ’ असेच आहे. उदा. ७ जनपथ, १० जनपथ, ११ जनपथ इ.

चक्रवर्ती सम्राट अशोकाची राजधानी “सारनाथ” येथील चार सिंह ही राजमुद्रा भारत सरकारची राजमुद्रा म्हणून घोषित झाली. ‘सत्यमेव जयते’ हे सम्राट आशोकांचे घोषवाक्य, ते भारतीय शासन व्यवस्थेचे ब्रीद वाक्य म्हणून मानांकित करण्यात आले. आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही बौद्ध संस्कृतीशी संबधीत आहे. अशा प्रकारे बोधिसत्व, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारत “बौद्धमय” केला आहे. यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही अशी भारतीय संविधानात तरतूद करून ठेवली आहे.

 

http://www.brambedkar.in/celebrating-50th-golden-years-of-return-of-dhamma/